देऊळवाडा प्रभाग समस्यांच्या गर्तेत ; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

युवासेना उपशहर युवा अधिकारी उमेश चव्हाण यांची नाराजी

मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा प्रभागाकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील गणपती विसर्जन स्थळाकडील गाळ काढण्याचा प्रश्न, डम्पिंग ग्राऊंड मधील कचऱ्याचा व तेथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न नागरिकांना त्रासदायक ठरत असून स्मशानभूमीच्या कामातील दिरंगाई प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही अद्याप काम अपूर्ण आहे. याबाबत युवासेना उपशहर अधिकारी उमेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली असून या सर्व गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!