माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस उत्साहात ; माजी खा. विनायक राऊतांकडून शुभेच्छा

मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, माजी नगरसेवक यतीन खोत यांचा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त श्री. खोत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी श्री. राऊत यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

येथील ठाकरे गटाच्या कार्यालयात श्री. खोत यांचा वाढदिवस तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, राजा शंकरदास, दत्ता पोईपकर, अक्षय भोसले, सचिन गिरकर, नंदा सारंग, सौ. शिल्पा खोत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तर निवासस्थानी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी परशुराम खोत, सौ. पूनम खोत, भाई कासवकर, निनाक्षी मेतर, दीपा शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.  

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3527

Leave a Reply

error: Content is protected !!