वाढदिवसानिमित्त निराधार वृद्धांना अन्नदान !

अमेय देसाई यांची सामाजिक बांधिलकी ; आनंदाश्रयमध्ये उपक्रम

मालवण : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा व्यावसायिक अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी अणाव येथील आनंदाश्रय येथे अन्नदान केले. दोन वर्षांपूर्वी आनंदाश्रय येथे आश्रयासाठी ठेवलेल्या श्री. पोरे यांची देखील यावेळी भेट घेतली. त्यांनी आपली दोन वर्ष आनंदात गेल्याचे सांगितले. यावेळी अमेय देसाई यांनी आश्रमातील ज्येष्ठ अनाथांची विचारपूस करून वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आनंदाश्रय अणावचे संस्थापक बबन परब हे उपस्थित होते. यावेळी दर्शन गावकर, ऍड रोहित गरगट्टे, तुषार मेस्त्री, संतोष (अण्णा) माणगावकर यांनीही अन्नदान केले

.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3527

Leave a Reply

error: Content is protected !!