गणेश विसर्जनातील अडथळे दूर ; दीपक पाटकर यांचे सेवाकार्य 

देऊळवाडा, आडारी, सागरी महामार्ग येथे केली विशेष व्यवस्था : नागरिकांनी मानले आभार 

मालवण : मालवण शहर परिसरात नदी किनाऱ्यालगत गणेश विसर्जन स्थळी भाविकांना गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभ व्हावे यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सुविधा उपलब्ध करून दिली. देऊळवाडा ब्रिजच्या बाजूला, आडारी गणपती मंदिर जवळ गणेश मूर्ती विसर्जन जेटी, सागरी महामार्ग रेवतळे विसर्जन जेटी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. 

गाळ व चिखलात पाय अडकू नयेत भाविकांना सुलभता मिळावी यासाठी दीपक पाटकर यांनी मातीने भरलेल्या गोण्या किनाऱ्यालगत व्यवस्थित बसवून देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गणेश विसर्जन ठिकाणी पाण्यात उतरून गणेश मूर्ती विसर्जन करणे भाविकांना सुलभ झाले. याबाबत नागरिकांनी दीपक पाटकर यांचे विशेष आभार मानले. 

यावेळी भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, भाजपा युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, राजु बिडये, शुभम लुडबे, निनाद बादेकर, अमेय बादेकर, अजित मसुरकर, जया मसुरकर, पंकज गावडे, समीर मडये, मुन्ना फाटक, बन्सी शिरोडकर, विजय फाटक, मिलिंद फाटक, बाळा फाटक, जैतापकर, गांवकर, संतोष कोरगावकर, रमाकांत फाटक, संतोष इब्रामपूरकर, पांड्या फणसेकर, गोपी मालवणकर, बाळा कवठकर, रवी मालवणकर, महेश गांवकर, राजु गांवकर, कवठकर, ओटवणेकर, पंडित देऊलकर आदी व अन्य उपस्थित नागरिकांनी दीपक पाटकर यांच्या सेवा कार्याचे कौतुक करत आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!