मालवणमधील नेरूरकर ज्वेलर्सच्या सुसज्ज दालनाचे दिमाखात उदघाट्न ; नावीन्यपूर्ण दागिन्यांचे कलेक्शन

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ; ७ सप्टेबर पर्यंत दागिन्यांच्या मजुरीवर २०% ची आकर्षक सुट

मालवण | कुणाल मांजरेकर

गेली १०० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या मालवण मधील मे. राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्सच्या बाजारपेठेतील नव्या सुसज्ज दालनाचा दिमाखदार उदघाट्न सोहळा मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी पार पडला. या निमित्ताने दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दागिन्यांच्या जडणघडणीच्या मजुरीवर २० टक्के सुट जाहीर करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी याठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली होती.

मालवण शहरात १९१४ साली सुरु झालेली मे. राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्स ही सराफी पेढी ग्राहकांच्या विश्वासाला पात्र असलेली पेढी म्हणून ओळखली जाते. नेरूरकर घराण्याची पाचवी पिढी आज या व्यवसायात उतरली असून बाजारपेठेतील सराफी पेढीचे नूतनीकरण करून प्रशस्त वास्तु उभी करण्यात आली आहे. या नव्या सुसज्ज दालनाचा उदघाट्न सोहळा शुक्रवारी कु. हिरन्या नेरूरकर, कु. यश रायकर, कु. जीत रायकर या चिमुकल्यांच्या हस्ते फित सोडवून करण्यात आला. यावेळी उमेश नेरूरकर, सौ. स्वप्नाली नेरूरकर, अंकित नेरूरकर, सौ. सिद्धी नेरूरकर, सौ. रिमा रायकर, सुशांत रायकर आदी उपस्थित होते. 

मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, सौ. स्मृती कांदळगावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेटे, बाळू अंधारी, जॉन नरोन्हा, परशुराम पाटकर, नाना साईल, विजय नेमळेकर, शेखर गाड, महेश कारेकर, मोहन शिरसाट, प्रमोद ओरसकर, रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलकर, विजय चव्हाण, सौ. पूनम खोत, अरविंद सराफ, हर्षल बांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर दिवसभर अनेकांनी येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!