VIDEO | उत्स्फूर्त प्रतिसादात मालवणात रंगली शिल्पा खोत मित्रमंडळाची महिला नारळ लढवण्याची स्पर्धा

सिद्धी करंगुटकर यांनी पटकवला प्रथम क्रमाकांचा सोन्या चांदीच्या नारळाचा चषक ; तर ऐश्वर्या काळसेकर द्वितीय क्रमांकाच्या सोन्याचे नाणे आणि सोन्याच्या नथीच्या मानकरी

आ. वैभव नाईक यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन ; ढोलताशांच्या गजराने वातावरणात रंगत ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील राजकीय, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमदार वैभव नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या बंदर जेटीवर सोमवारी आयोजित केलेल्या दहाव्या राज्यस्तरीय महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शेकडोंच्या संख्येने या स्पर्धेला महिलांनी उपस्थिती दर्शवली. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाट्न झालेल्या या स्पर्धेत सिद्धी करंगुटकर यांनी प्रथम क्रमाकांचा सोन्या चांदीच्या नारळाचा चषक पटकवला. तर ऐश्वर्या काळसेकर द्वितीय क्रमांकाच्या सोन्याचे नाणे आणि सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या. याशिवाय या स्पर्धेत विविध बक्षिसे ठेवण्यात आली होती. ढोल ताशांचा गजराने या स्पर्धेला रंगत आली होती.

मालवणमध्ये महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने सलग दहा वर्षे नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा घेण्यात येते. यंदा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहयोगाने मालवण बंदर जेटीवर ढोलताशांच्या गजरात ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उदघाट्न आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, नंदा सारंग, पूनम चव्हाण, डॉ. शिल्पा झाटये, माजी पंचायत सभापती पूनम खोत व सहकारी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर मशाल पेटवून शंखनाद करण्यात आला. सौ. चारुशीला आढाव यांच्या मालवणी गाऱ्हाण्याने व स्वराज्य ढोलताशा पथकाच्या वादनाने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. 

स्पर्धेच्या विजेता सिद्धी करंगुटकर यांना प्रथम मानाचा सोन्या चांदीचा नारळ चषक, सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ, येवला पैठणी व सन्मान पत्र देण्यात आले. तर उपविजेत्या ऐश्वर्या रुपेश काळसेकर यांना सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ, आकर्षक चषक, इरकल पैठणी व सन्मान पत्र देण्यात आले. तर उत्तेजनार्थ योगिता सरमळकर यांना सोन्याची नथ, आकर्षक चषक, इरकल सन्मान पत्र, चांदीचा दिवा देण्यात आला.

पहिली ते सातवी मुली नारळ लढविणे स्पर्धेत आरोही नरे हिला सन्मान पत्र, भेटवस्तू देण्यात आली. तर द्वितीय प्रांजल पेंडूरकर हिला सन्मानपत्र भेटवस्तू, तृतीय क्रमांक निशा धुरी सन्मानपत्र भेटवस्तू आणि चिन्मयी खोत हिला चतुर्थ क्रमाकांचे सन्मानपत्र भेटवस्तू देण्यात आले. स्पर्धेतील प्रथम २०० जणांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आली. तर पु. ना. गाडगीळ व सौ. शिल्पा खोत यांच्या तर्फे पु. ना. गाडगीळ चांदीच्या कॉइनची लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. याची 1500 कुपन वाटण्यात आली. मुलांच्या स्पर्धेत मंदार ओरस्कर आणि सौ. शिल्पा खोत मित्रमंडळ संयुक्त बक्षिसे दिली. स्पर्धेचे निवेदन बादल चौधरी आणि अक्षय सातार्डेकर यांनी केले. 

यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष बाळू अंधारी, वैशाली शंकरदास, रूपा कांदळकर, शुभांगी सुखी, पल्लवी तारी, स. का. पाटील कॉलेजचे प्रा. लेफ्टनंट खोत, सुमेधा नाईक, डॉ. शिल्पा झाटये, दादा वेंगुर्लेकर, सायली कांबळी मुंबई, चारुशीला आढाव, प्रतिभा चव्हाण, बाबी जोगी, भाई कासवकर, सेजल परब, नितीन तोडणकर, जगदीश तोडणकर, दिलीप पवार, प्रवीण रेवणकर, तुषार पांचाळ, नंदा सारंग, महेंद्र म्हाडगुत, नरेश हुले, मनोज मोंडकर, निनाक्षी मेतर, सुरवी लोणे, सोनाली डिचवलकर, माधुरी प्रभू, तृप्ती मयेकर, महेश जावकर, आर्या गावकर, दर्शना कासवकर, व्यावसायिक जॉन नरोना यांच्यासह लायन्स क्लब, मातृत्व आधार फाउंडेशन, सिंधुरक्तमित्र पदाधिकारी, प्रणिमित्र संस्थांची उपस्थिती लाभली. गतवर्षीच्या विजेत्या नंदिनी परब, तेजल सोपारकर यांनी मुंबई वरून खास उपस्थिती लावली होती. तसेच जिल्ह्याच्या बाहेरून बऱ्याच महिलांनी सहभाग घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!