तळगाव श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ मंदिर परिसरातील समाज मंदिर बांधकामासाठी ५० लाख मंजूर
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ दळवी यांचा पाठपुरावा ; भाजपा नेते निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील तळगाव येथील श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ मंदिर परिसरातील समाज मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी तळगावचे सुपुत्र तथा मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ रघुनाथ दळवी, दारवळवाडीचे सुपुत्र दत्तू सावंत यांनी पाठपुरावा केला. भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले. हा निधी मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.