महिलेने १०८ रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म !

मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्रकार ; बाळ आणि आई दोघेही सुखरूप

मालवण | कुणाल मांजरेकर

१०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेने रुग्ण वाहिकेतच बाळाला जन्म दिल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी मालवण तालुक्यातील कट्टा येथे घडला. या महिलेवर रुग्णवाहिकेतील डॉक्टर दत्तपसाद बापट यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेने मुलाला जन्म दिला असून बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. 

विजापूर पट्ट्यातील मूळ रहिवाशी असलेली सोना संतोष तांबे ही महिला आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मालवण ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिची तपासणी केल्यावर तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तिला १०८ रुग्णवाहिकेतून ओरोस येथे नेत असताना कट्टा येथे रुग्णवाहिकेतच तीने बाळाला जन्म दिला. रुग्णवाहिकेतील डॉक्टर दत्तप्रसाद बापट यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांना पायलट अवधूत परुळेकर, महेश वस्त यांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!