गावातील सेवा सोसायट्या व शेतकरी यांचे नाते अतूट : आ. नितेश राणे

वैभववाडी येथे प्राथमिक विकास संस्था परिसंवाद मेळावा संपन्न ; बँक स्तरावर शंभर टक्के पूर्णफेड केलेल्या विकास संस्थांचा सत्कार

आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी जिल्हा बँकेची ओळख आहे. बँकेशी संलग्न असणाऱ्या सोसायट्या, सेवा संस्था या वाडीवस्तीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विकासाच्या दृष्टीने विचार केल्यास बँक आणि सेवा संस्था यांच्यातील संवाद यापुढेही अधिक घट्ट राहीला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे  यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकेचे चेअरमन, संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनी पारदर्शक व प्रामाणिक काम केले आहे. यापुढे देखील शून्य टक्के राजकारण या धर्तीवर या बँकेची वाटचाल राहील असेही राणे यांनी सांगितले. 

वैभववाडी येथील आनंदिबाई रावराणे सभागृहात रविवारी प्राथमिक विकास संस्थांचा परिसंवाद संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी आ. नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासापीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बॅकेचे संचालक दिलीप रावराणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बॅकेचे सरव्यवस्थापक कर्ज विभाग प्रमुख के बी वरक, संगणक संस्था प्रमुख वसंत हडकर, क्षेत्र वसुली विभाग सरव्यवस्थापक भाग्येश बागायतकर, तालुका विकास विकास अधिकारी,प्रल्हाद कुडतरकर, विकास संस्था अध्यक्ष ,उपाध्यक्ष, गट सचिव, सभासद आदी उपस्थित होते.

यावेळी ३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जाची १०० टक्के वसुली केल्याबद्दल श्री दिर्बादेवी विकास संस्था तिथवली,चांदभारत विकास संस्था उंबर्डे,श्री केदारलिंग विकास सोसा हेत.,श्री शंकर प्रा. विकास संस्था नाधवडे,श्री, शिवाजी विकास संस्था, तिरवडेश्री महालश्मी विकास संस्था कोकिसरे,श्री अचिर्णे विकास संस्था,श्री कुंभजाई विकास संस्था कुंभवडे,वाभवे विकास संस्था,श्री रवळनाथ विकास संस्था एडगांव, श्री गांगेश्वर विकास संस्था गडमठ, श्रीदेव गांगो विकास संस्था लोरे, श्री ग्रामसेवा विकास विकास संस्था सोनाळी, सिध्दगांगेश्वर विकास संस्था उपळे,श्री  देव ठाणेश्वर  विकास संस्था नापणे, श्री.एकविरा विकास संस्था नानीवडे ,श्री कुसुर विकास संस्था,श्री राम विकास संस्था नावळे, श्री ओम विकास संस्था आखवणे श्री छत्रपती शिवाजी विकास संस्था अरूळे, श्री प्रकाश विकास संस्था कुर्ली, श्री रवळनाथ विकास संस्था सडूरे,अशा बँक स्तरावर संस्थास्तरावर  १००टक्के कर्ज पूर्ण फेड करण्यात आलेल्या विकास संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव याचा सत्कार मनिष दळवी ,संचालक  दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी बँक संचालक दिलीप रावराणे विचार मांडले. कणकवली तालुक्यातील गटसचिवांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा सत्कार केला व अभिनंदन केलं. उपस्थितांचे आभार शरद सावंत यांनी मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3839

Leave a Reply

error: Content is protected !!