“एमआयटीएम” च्या विद्यार्थ्यांचे डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या निकालात उल्लेखनीय यश
सिव्हिल विभागातून ऐश्वर्या पालव प्रथम तर राजेंद्र वळंजू, महेंद्र चव्हाण अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी
मेकॅनिकल विभागातून साक्षी जिकमडे प्रथम तर वासुदेव परब आणि माहिली आणि द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्र शासनाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाचा उन्हाळी सत्र परीक्षेचा सिव्हिल व मेकॅनिकल विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
अंतिम वर्ष अभियांत्रिकी पदविका परीक्षेचा सिव्हिल तसेच मेकॅनिकल विभागाचा निकाल १०० % लागला असून सिव्हील विभागातून ऐश्वर्या पालव हिने ८५.४४ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर राजेंद्र वळजू याने ७६.७८% गुण मिळवून द्वितीय व महेंद्र चव्हाण याने ७१.११ % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे मेकॅनिकल विभागातील साक्षी जिकमडे हिने ७९.७८ % मिळवून प्रथम क्रमांक पटकविला असून वासुदेव परब याने ७९% गुण मिळवून द्वितीय तर माहिली परब हिने ७६.५६ % गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सचिव नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, डिग्री प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा प्राचार्य विशाल कूशे, अकॅडमिक डीन पुनम कदम यांनी अभिनंदन केले आहे.