इस्टोअर गुंतवणूकधारांसाठी मनसे मोठा लढा उभारणार

उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांची माहिती

मालवण : इस्टोअर या कंपनीने अनेक लोकांचे पैसे बुडवून कंपनीचे मालक फरार झाले आहेत. तसे असले तरी ज्या स्थानिक एजंट मार्फत लोकांनी पैशाची गुंतवणूक केली अश्या लोकांचे पैसे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रसंगी कायदा हातात घेऊन गोरगरीब जनतेचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मनसेचे उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिली आहे.

ज्या एजंटनी कमिशनच्या हव्यासापोटी लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले अश्या एजंटनी करोडो रुपयांची प्रॉपर्टी गोळा केली आहे. अश्या एजंटना कंपनीच्या माध्यमातून गोळा केलेली संपत्ती विकून गोरगरीब जनतेचे पैसे देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाग पाडेल. दोन देखील गणेश वाईरकर यांनी म्हटले आहे. लवकरच सर्व गुंतवणूकधारांची एक बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवली जाईल. यात जिल्ह्यातील अनेक बडे व्यक्ती एजंट म्हणून काम करत होते. आणि सध्या हे लोक अगदी ऐशआरामदायी जीवन जगत आहेत. अश्या लोकांची झोप उडवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. ज्या गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले असतील त्यांनी मनसे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांना ८२७५३१५४५४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!