आ. वैभव नाईक यांच्यावतीने आचरा विभागात मोफत वह्या वाटप

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आणि उबाठा शिवसेनेच्या सहकार्यातून आचरा येथील प्रशालेत शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानदिप विद्यामंदिर वायंगणी, जनता विद्या मंदिर त्रिंबक, कै. बा. ना. बिडये विद्यालय आचरे नं.१ या शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये आमदार वैभव नाईक यांनी वह्या वाटप करून सहकार्य केले आहे. येथील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन पुढे येण्यासाठी उभाठा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे सुद्धा आमदार वैभव नाईक आणि आम्ही सर्व शिवसैनिक येथील शैक्षणिक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. 

यावेळी महिला तालुका संघटक दिपा शिंदे, विभागप्रमुख समीर लब्दे, महिला विभाग संघटक अनुष्का गावकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, उपविभाग प्रमुख  सचिन रेडकर, ग्रा. पं. सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, युवतीसेना विभाग प्रमुख आर्या गावकर, सरपंच नेहा तोंडवळकर, ग्रा. पं. सदस्य पूर्वा तारी, श्रीकांत बागवे, शाखाप्रमुख दिनेश साळकर, शाखाप्रमुख सतीश हडकर, शाखाप्रमुख संतोष गौरवले, शाखाप्रमुख संतोष घाडीगावकर, जेष्ठ शिवसैनिक सदानंद राणे, आबा सावंत, रुपम टेमकर, उपसरपंच समृद्धी आस्वलकर, हरी साटम, सागर बागवे, महिला आचरा विभाग समन्वयक संजना रेडकर, युवासेना शहर युवा अधिकारी विद्यानंद(मुन्ना) परब, युवासेना विभाग युवा अधिकारी नितीन घाडी,आचरा शहर प्रमुख माणिक राणे, सदानंद घाडी, माजी सरपंच शाम घाडी, संजय वायंगणकर, शेखर मुणगेकर, पपू कदम, महेश घाडी, सचिन बागवे, मंदार घाडी, अनंत बांदेकर, सुधाकर वायंगणकर, दाजी भाटकर आणि उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी, ज्ञानदिप विद्यामंदिर वायंगणी येथील मुख्याध्यापक टकले सर, वसावे सर, कुणकवळेकर मॅडम, आडे सर, सुर्वे मॅडम, सावंत मॅडम, शिंदे मॅडम आदी उपस्थित होते. जनता विद्या मंदिर त्रिंबक येथील मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सहाय्यक शिक्षक महेंद्र वारंग, विजय मेस्त्री, अभिजीत धुरे, घाडीगावकर मॅडम, गायकवाड सर, तावडे मॅडम आदी उपस्थित होते. कै. बा. ना. बिडये विद्यालय आचरे नं.१ येथील मुख्याध्यापक अनिता पाटील, शिक्षक आडे सर, हळवे सर, बिसेन मॅडम, समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर, उपाध्यक्ष अर्पिता घाडी, सदस्य संदीप पांगम, ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!