मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रम
दुसऱ्या श्रावण सोमवारी श्री देवी सातेरीचा तर पाचव्या सोमवारी श्री भावई देवीचा जत्रोत्सव
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात श्रावण मासानिमित्त सोमवार दि. ५ ऑगस्ट ते सोमवार दि. २ सप्टेंबर या कालावधीत विविध कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पहिला श्रावण सोमवार, दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी श्री देव रामेश्वर मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम (सायं. ५ ते ८ वाजेपर्यंत) होणार आहे. शनिवार, दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी पहिला दादरा (खापरेश्वर) (सायं. ६.३० वा. निघतील.) रविवार, दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन्ही दादरे रांजेश्वर, सिसमोडा (सायं. ६.३० वा. निघतील.) दुसरा श्रावण सोमवार, दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी श्री देवी सातेरी जत्रौत्सव (सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम) तिसरा श्रावण सोमवार, दि. १९ ऑगस्ट २०२४ रोजी श्री देव रामेश्वर मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम (सायं. ५ ते ८ वाजेपर्यंत) चौथा श्रावण सोमवार, दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्रौ १२ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे गोकुळाष्टमी उत्सव. मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत रोज सायं. ७.३० वाजल्यापासून श्री देव नारायण मंदिर येथे पुराण वाचन व किर्तनाचा कार्यक्रम. मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिरात किर्तन व गोपाळकाला. शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी (व्दादशी) सायं. ५ वाजता श्री देव नारायण मंदिर येथे गोपाळकाला. पाचवा सोमवार, दि. २ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर येथे लघुरुद्र, सकाळी ९.३० वाजता श्री वरदशंकराची महापूजा. दुपारी १ वाजल्यापासून तिर्थप्रसाद श्री देवी भावई जत्रौत्सव. सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.