टोपीवाला हायस्कुल परिसरात आ. वैभव नाईकांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषध फवारणी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपक्रम ; शालेय प्रशासन आणि पालकांनी मानले आभार
हत्तीरोग निर्मूलनासाठी संपूर्ण शहर परिसरात आणखी काही दिवस औषध फवारणी मोहीम सूरू राहणार
मालवण : मालवण शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शहरात डास निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणी मोहीम सूरू करण्यात आली आहे. शहरातील टोपीवाला हायस्कुल व्यवस्थापन व पालक यांनी मागणी केल्याप्रमाणे संपूर्ण शाळा परिसरात औषध फवारणी करण्यात आली. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही औषध फवारणी करण्यात आल्याचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिल्पा खोत यांनी सांगितले.
यावेळी गणेश लुडबे, शंकर निकम, किशोर तळाशीलकर, मनोज शिरोडकर, संदीप लुडबे उपस्थित होते. मालवण शहरात दोन दिवस ही मोहीम सूरू असून संपूर्ण शहर परिसरात आणखी काही दिवस औषध फवारणी मोहीम अश्याच सातत्यपुर्ण पद्धतीने सूरू राहणार आहे. असे मंदार केणी म्हणाले.