खूप शिका आणि मोठे व्हा ; शिक्षण ही काळाची गरज !

सौ. स्नेहा वैभव नाईक यांचे प्रतिपादन ; आडवली मालडी जि. प. मतदार संघात आ. वैभव नाईक यांच्यावतीने वह्या वाटप

मालवण | कुणाल मांजरेकर

शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे मुलांनी खूप शिका आणि मोठे व्हा. आजच्या युगात संगणकीय ज्ञान देखील महत्त्वाचे आहे. ते आत्मसाद करा, असे प्रतिपादन सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी येथे बोलताना केले. तुम्हाला उज्ज्वल यश मिळविण्यासाठी एक कौतुकाची थाप म्हणून आ. वैभव नाईक यांच्यावतीने छोटीशी भेट म्हणून वह्या वाटप केले जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

मालवण तालुक्यातील आडवली मालडी जि. प. मतदार संघात आ. वैभव नाईक यांच्यावतीने वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आडवली माडली जि. प. मतदार संघातील गोठणे कोंडवाडी, गोठणे सडेवाडी, निरोम शाळा शाळा नं. १, मठबुद्रुक शाळा नं १ व शाळा नं २, बुधवळे शाळा नं. १, मठबुद्रुक पाणलोस शाळा या शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर म्हणाले, तुम्ही वर्षभर अभ्यास करता व वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेता. त्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करता. यासाठी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी यासाठी एक छोटीशी भेट तुम्हाला देण्याचे काम करत आहेत. या मतदार संघातील जि. प. शाळांना जे जे सहकार्य करायला मिळेल तेवढे आम्ही करु असे सांगून आपली गुणवत्ता वाढवा व शाळेचे गावांचे नाव उज्ज्वल करा, असे ते म्हणाले. यावेळी रामगड सरपंच शुभम मठकर, अरूण लाड, सुभाष धुरी, हेमंत पारकर, बंडु चव्हाण, अमित फोंडके, स्वप्नील पुजारे, जयराम परब, विजय परब, मुरलीधर हाटले, संतोष घाडी, प्रल्हाद राऊत, नारायण राऊत, संजय परब, विनायक राऊत, मनोज राऊत, बांबू राऊत, विश्वास आचरेकर, संजय राऊत, सुधाम राऊत, संदेश राऊत, दिलीप घाडी, देवेन राऊत, करण राऊत, हरिश्चंद्र कांदळकर, रूपेश मुळये, स्वप्नील शिंदे, रामदास पेडणेकर, विघ्नेश गोलतकर, सागर कदम, संतोष गोलतकर, राकेश गावडे, विश्वास आचरेकर, ग्रामपंचायत सदस्या नम्रता गायकवाड, श्री. पानवलकर, शाखाप्रमुख अभिमन्यु येरम, उत्तम गावडे, राजु घागरे, रामचंद्र हिंदळेकर, सत्यवान बाईत, मानसी बाईत व शिवसैनिक, सर्व शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!