आ. वैभव नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून कन्याशाळा, रेवतळे शाळेत वह्या वाटप
कन्याशाळेतील शौचालयाची गरज आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून सोडवणार : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण आणि आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील कन्याशाळा आणि रेवतळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (फाटक शाळा) विद्यार्थ्याना वह्यावाटप करण्यात आले. दरम्यान, कन्याशाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करून या प्रशालेला शौचालयाची उणीव भासत आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून येथील शौचालयाचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली.
धुरीवाडा कन्याशाळेमध्ये आयोजित वह्यावाटप कार्यक्रमात व्यासापीठावर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, भाई कासवकर, बंड्या सरमळकर, युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख शिल्पा खोत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, नंदा सारंग, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख संदेश कोयंडे, मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, प्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रद्धा गोसावी, उप शिक्षिका वैशाली चव्हाण, प्रवीण साबळे आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर, शिल्पा खोत यांनी विचार मांडले.
तर रेवतळे येथील जि. प. प्राथमिक शाळेत व्यासपीठावर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, बंड्या सरमळकर, माजी नगरसेविका शिला गिरकर, युवतीसेना कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख शिल्पा खोत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, नंदा सारंग, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, सिद्धेश मांजरेकर, राजन बादेकर, विघ्नेश मांजरेकर, अजय आळवे, उत्कर्ष मांजरेकर, सर्वेश लुडबे यांच्यासह मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, शिक्षक घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर, शिला गिरकर, मंदार केणी, मंदार ओरसकर यांनी विचार मांडले. यावेळी शाळेनजिक पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी काढण्याची ग्वाही मंदार केणी यांनी दिली.