सत्तेत असताना काही करता आलं नाही, घरचा रस्ता दिसल्यावर वैभव नाईकांची फडफड सुरु

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची टीका ; दहा वर्षात आश्वासना पलीकडे काहीच न केल्याचा टोला

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी विधिमंडळा बरोबरच विधिमंडळाच्या बाहेर आक्रमक होणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी टीका केली आहे. सत्तेत असताना काही करता आले नाही, पण घरचा रस्ता दिसल्यावर वैभव नाईक यांची नौटंकी सुरु आहे. गेल्या १० वर्षात आश्वासना पलीकडे त्यांना काहीच करता आलं नाही. पण जनता घरचा रस्ता दाखवणार हे लक्षात आल्यावर आमदार वैभव नाईक हे अनेक विषयावर जनतेची काळजी आहे असा आभास निर्माण करत असल्याचा आरोप श्री. चिंदरकर यांनी केला आहे.

श्री. चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आमदार वैभव नाईक विधान भवनात तर कधी रस्त्यावर नौटंगी करताना दिसत आहेत. कधी अधिकाऱ्यावर ओरडणे तर कधी आंदोलनाची भाषा करणे अशी ड्रामेबाजी करताना दिसत आहेत. सत्ता असताना जर वेळोवेळी लोकांच्या प्रश्नांवर मंत्रालयात जाऊन धोरणात्मक निर्णय घेतले असते आणि सत्तेचा वापर जनतेसाठी केला असता तर अशी नौटंकी करण्याची वेळ आली नसती. सिंधुदुर्गातील जनता आता समजून चुकली आहे की जे सत्तेत असताना काही करु शकले नाहीत ते आता घरी बसता बसता काय विकास करणार ? आपल्या भविष्याचा ग्राउंड रिपोर्ट त्यांच्या लक्षात आला असून दिवा विझताना जशी फडफड वाढते, तशी विधानसभा निवडणूक जवळ येईल, तशी ती फडफड वाढत जाईल. मात्र जनतेचा निर्णय पक्का आमदार वैभव नाईक यांना कन्फर्म धक्का असे धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!