भाजपा नेते निलेश राणे यांनी केले संजय नाईक कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या पेंडूर येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, संतोष साटविलकर, दीपा सावंत, आतिक शेख, सतीश वाईरकर, सुमित सावंत यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!