कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण : ग्रामस्थांनी मानले निलेश राणेंचे आभार
शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजपा नेते निलेश राणेंच्या माध्यमातून स्वखर्चाने काम पूर्ण
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी शाळेत असलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली नाही. या दुर्घटनेची भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी दखल घेत या शाळेला भेट देऊन इमारतीची पाहणी त्यांनी घेतली. यावेळी शाळा दुरुस्तीसाठी उपाययोजना करण्याची ग्वाही ग्रामस्थांना देत शासनाकडून हे काम नियोजित वेळेत होत नसेल तर आपण स्वखर्चाने हे काम करून देऊ, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार मागील आठवड्यात या शाळा दुरुस्तीच्या कामाला निलेश राणेंच्या वैयक्तिक खर्चातून सुरुवात करण्यात आली होती. हे काम पूर्णत्वाला गेले असून विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. याबद्दल येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.
मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव नं-२ या शाळेच छप्पर कोसळून मोठी वित्तहानी झाली होती, या संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी करून संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. जर प्रशाससकीय बाबींमुळे याबाबत कार्यवाही करण्यास विलंब होत असेल तर आपल्या स्वखर्चातून शाळा दुरुस्तीचे काम करण्याची व्यवस्था करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार मागील आठवड्यात या कामाला निलेश राणे यांनी स्वखर्चाने सुरुवात केली होती.