हरी खोबरेकर यांची कारकिर्द लोकसेवेचीच ; तालुक्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांचाच !
अभी लाड यांनी सर्वप्रथम स्वतःच्या वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, लोकसेवेची कारकिर्द असलेल्या खोबरेकरांसारख्या कार्यसम्राट नेतृत्वावर टीका करण्याचा बलिशपणा करू नये
ठाकरे गट युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर यांचे प्रत्युत्तर ; खोबरेकरांचे जि. प. मधील काम तुमच्याच तत्कालीन जि. प. अध्यक्षांना विचारून घ्या
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभी लाड यांना ठाकरे गट युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हरी खोबरेकर यांची कारकिर्द लोकसेवेचीच असून मागील जिल्हा परिषद निवडणुकीत मालवण तालुक्यातून सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते एकमेव सदस्य होते. याची आठवण रेवंडकर यांनी करून दिली आहे. अभि लाड यांनी सर्वप्रथम स्वतःच्या वाडीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा, नंतर हरी खोबरेकरांसारख्या लोकनेत्यावर बोलावे, खोबरेकरांचे जि. प. मधील काम तुम्हाला माहित नसेल तर तुमच्याच पक्षाच्या तत्कालीन जि. प. अध्यक्षांना विचारून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
हरी खोबरेकर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केल्यानंतर अभि लाड यांनी त्यांच्यावर तोफ डागली होती. त्याला अक्षय रेवंडकर यांनी देखील जोरदार प्रत्तुत्तर दिले आहे. जिल्हा परिषद सदस्य पदाच्या कारकीर्दीमध्ये खोबरेकर यांचा कार्य अहवाल कदाचित भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती नसेल, पण मालवण तालुक्यातील सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येणारे एकमेव जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर होते. खोबरेकर यांची सभागृहातील आक्रमकता तसेच शेतकरी, मच्छिमार आणि विविध घटक यांच्या प्रशांनावरील त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये उठविलेले आवाज कदाचित भाजप पदाधिकाऱ्यांना माहिती नसतील तर जि.प. अध्यक्ष तुमचे होते त्यांना विचारून घ्यावे. आज आपल्या मतदार संघातील पाण्याचा प्रश्न, बंधाऱ्याचा प्रश्न, मच्छिमारांचा प्रश्न, इतर व्यावसायीकांचे प्रश्न, रस्ते असतील, वीज पुरवठा प्रश्न, नेटवर्क उपलब्धतेचा प्रश्न, आंबा बागायततदारांचे प्रश्न, पर्यटनाला चालना देण्याचे काम या सर्व बाबींचा सातत्याने माजी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून त्यांनी तडीस लावले.
आमदार वैभव नाईक यांच्या काळामध्ये बस स्थानक मंजूर झाले. कोरोना काळामध्ये संबंधित राज्य परिवहन मंडळाकडे निधीची कमतरता होती. कोरोना काळानंतर त्यास चालना मिळाली. परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपा आणि गद्दार गटाचे सरकार आल्यानंतर त्या कामास हवा तसा निधी देण्यात आला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य परिवहन मंडळास निधी देऊन ते काम पूर्ण करण्यास तुम्ही अपयशी ठरलात आणि या अपयशाचे खापर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर फोडू नये. कालच्या अर्थसंकल्पात राज्य परिवहन मंडळाकडे दुर्लक्ष करण्यात आला. त्यामुळे तिजोरीत खडखडाट असताना येण्याऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या फक्त केलेल्या घोषणा आहेत, असे अक्षय रेवंडकर यांनी म्हटले आहे.