कांदळगाव प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी निलेश राणेंचा पुढाकार
प्रशासनाला तातडीने कार्यवाहीच्या सूचना ; प्रशासनास विलंब होत असेल तर स्वखर्चाने दुरुस्तीचे काम करणार
मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी प्राथमिक शाळा नं. २ ची इमारत कोसळल्याची दुर्घटना यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी घडली होती. सुदैवाने यावेळी शाळेत असलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना दुखापत झाली नाही. या दुर्घटनेची भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी तातडीने दखल घेतली आहे. आज या शाळेला भेट देऊन इमारतीची पाहणी त्यांनी घेतली. यावेळी शाळा दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना निलेश राणे यांनी देत शासनाकडून हे काम होत नसेल तर आपण स्वखर्चाने हे काम करून देऊ, अशी ग्वाही त्यानी दिली आहे.
मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कांदळगाव परबवाडी नं. २ या शाळेचे छप्पर कोसळून मोठी हानी झाली होती. या संदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी आज कांदळगाव येथे भेट देऊन शाळेची पहाणी केली. यावेळी संबंधित विभागाला त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. जर प्रशासनाकडून कार्यवाही करण्यास विलंब होत असेल तर आपल्या स्वखर्चातून शाळा दुरुस्तीच काम करण्याची व्यवस्था केली असून आजपासून या शाळेच्या दुरुस्तीच काम सुरू होईल, व लवकरात लवकर ही शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार आहे.