अखेर मालवण मधील “तो” रस्ता वाहतुकीला खुला !
मालवण : शहरातील कसाल – मालवण राज्य महामार्गावरील हॉटेल स्वामी नजिकच्या रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने याठिकाणी मोरी बांधण्यासाठी हा रस्ता १४ जुनपासून बंद केला होता. सदरील काम पूर्ण झाल्याने आजपासून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. या कालावधीत नागरीक, विदयार्थी, वाहनचालक, पादचारी व पर्यटक यांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन रोड क्रॉसिंग गटार बांधकाम करण्यास सहकार्य केल्याबद्दल पालिकेने आभार मानले आहेत.
मालवण नगरपरिषद बांधकाम विभागाने आगामी पावसाळा कालावधी विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मामा वरेरकर नाट्यगृह नजीक स्वामी हॉटेल जवळ पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी आरसीसी रोड क्रॉसिंग गटर बांधकाम करणेकरीता राज्य मार्ग क्र. १८२ (मालवण कसाल) वझे कॉर्नर ते मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी ते भरड मार्गावरील वाहतूक १४ जुन पासून पुढील किमान ७ दिवस बंद ठेवली होती. हे काम पूर्णत्वास गेले असून आज पासून राज्य मार्ग क्र. १८२ (मालवण कसाल) वझे कॉर्नर ते मामा वरेरकर नाट्यगृह ते हॉटेल स्वामी ते भरड हा मार्ग वाहतुकीस पूर्ववत खुला केला आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.