कोकण रेल्वेच्या टीसींकडून वर्षभरात २१.१७ कोटींची दंड वसूली ; कोकण रेल्वेने केला विशेष सन्मान

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीस यांना सन्मानित करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसानी तब्बल २१ कोटी १७ लाख ८० हजार ७४१ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळी विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसानी उत्कृष्ट कामगिरी करत ७८११५ कारवाया केल्या. यातून २१ कोटी १७ लाखाचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसाना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या  हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसानी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!