खळा बैठकात विनायक राऊतांच्या विसर्जनाची तयारी !

धोंडी चिंदरकर : संपलेल्या सिडकोच्या मुद्द्याचा राजकीयदृष्ट्या बाऊ करण्याचा प्रयत्न

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणयासाठी विनायक राऊत यांना येथील मतदारांनी सलग दोनदा या भागाचे खासदार म्हणून संसदेत पाठवले. मात्र दोन्ही वेळेला सत्तेत असूनही या भागाचा विकास करण्यात विनायक राऊत अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून दोनदा येथून विजय मिळवणाऱ्या विनायक राऊत यांनी थेट मोदीसाहेबांवरच टीका करण्याचा कृतघ्नपणा दाखवला आहे. खासदारकीच्या काळात स्वतःचा खासदार निधी देखील अखर्चित ठेवण्याचा पराक्रम या निष्क्रिय खासदारांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत खळा बैठकात विनायक राऊतांच्या विसर्जनाची तयारी येथील जनतेने केली आहे, अशी टीका भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केली आहे.

खा. विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात विकासाचा भकास करुन दाखवल्यामुळे लोकच आता राऊतांच्या विसर्जनाची तयारी वाडी वस्त्यांवर करताना दिसत आहे. राऊतांच विसर्जन होणार हे नक्की. पण खळा बैठकांची उपस्थिती पाहून आमदार वैभव नाईक यांच्या पण विसर्जनाची नांदी सुरू याची आहे, याची पण उबाठा कार्यकर्त्यानी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे. खा. राऊत सध्याच्या निवडणुकीत सिडकोचा मुद्दा घेऊन प्रचार करीत आहेत. पण सिडको हा निर्णय महायुती सरकारने रद्दबातल केला असून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार खा. राऊत यांनी बंद करावेत. जो खासदार स्वतःचा खासदार निधी मतदार संघात वापरू शकत नाही, तो विकास काय करणार ? यापूर्वी कोकणातील जनतेने मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्याकडे पाहून तुम्हाला दोनवेळा संसदेत पाठवले. पण आता भाजपा सोबत नसल्याने विनायक राऊत यांचा पराभव अटळ आहे, असे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!