गोव्यातील सहाव्या सुपर मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स स्पर्धेत सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे सुयश
चारुदत्त शेणई (तिरोडा, सावंतवाडी), प्रशांत सारंग (देवगड), निलेश म्हसकर (वेंगुर्ला) यांच्याकडून १२ पदकांची कमाई
सिंधुदुर्ग : बांबूळी ॲथलेटिक्स स्टेडियम, मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, मडगांव व यश शूटिंग रेंज म्हापसा गोवा येथे ८ ते १३ फेब्रुवारीला पार पडलेल्या सहाव्या सुपर मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्तुंग यश मिळवले आहे. यात चारुदत्त शेणई (तिरोडा, सावंतवाडी, प्रशांत सारंग (देवगड), निलेश म्हसकर (वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. या तीन खेळाडूंनी तब्बल १२ पदकांची कमाई केली. यात सहा गोल्ड, ५ सिल्व्हर आणि १ ब्रॉन्झ पदकाचा समावेश आहे.
यातील चारुदत्त शेणई यांनी तिहेरी उडी – गोल्ड मेडल, उंच उडी -गोल्ड मेडल, लांब उडी -सिल्व्हर मेडल, ४ × १०० रिले- गोल्ड मेडल, ४ × ४०० रिले- सिल्व्हर मेडल अशी पाच पदके मिळवली आहेत. निलेश म्हसकर यांनी ५ किमी वॉल्क -ब्रॉन्झ मेडल, ३ किमी स्टीपल चेस – सिल्व्हर मेडल, बांबू उडी – गोल्ड मेडल, ४ × १०० रिले – गोल्ड मेडल, ४ × ४०० रिले- सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे. तर.प्रशांत सारंग यांनी १० मी. एअर पिस्टल शूटिंग – सिल्व्हर मेडल व ४× ४०० रिले मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
हे तिन्ही खेळाडू हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यातील खेळाडू हे जागतिक, आंतरराष्ट्रीय, आणि खुले राष्ट्रीय गेम्स खेळलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातून खेळत असताना ते जागृती क्रीडा मंडळ वेंगुर्ले या अकॅडमी मधून खेळत होते. त्यांना जागृतीचे अध्यक्ष कै. संजय मालवणकर आणि शेखर सामंत यांचे मार्गदर्शन लाभले.