Big Breaking : माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर मनसेची मोठी कारवाई

कारवाई नंतर उपरकर यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणतात…

मालवण | कुणाल मांजरेकर

मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर मनसेने मोठी कारवाई केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही, असे मनसे नेते शिरीष सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे. यामुळे सिंधुदुर्गच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेच्या दोन गटात गेले दीड ते दोन वर्ष गटबाजी उफाळून आली होती. या वादातून राज ठाकरे यांनी मागील वर्षीच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात मनसेची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली. मात्र अलीकडेच उपरकर विरोधी गटाकडे मनसेची धुरा देण्यात आल्याने उपरकर समर्थक पदाधिका ऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता थेट उपरकर यांच्यावर कारवाई करत त्यांची एक प्रकारे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार परशुराम उपरकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. आपला पुढील निर्णय सहकारी पदाधिकारी यांच्याशी बोलून जाहीर केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!