महोदय पर्वणीच्या औचित्यावर निरुखेचा श्री देव रवळनाथ उद्या वायरी भूतनाथ गावी

महोदय पर्वणी निमित्ताने शुक्रवारी ९ रोजी जाणार समुद्रस्नानाला

मालवण : महोदय पर्वणीचे औचित्य साधून श्री देव रवळनाथ पंचायतन निरूखे कुडाळ हे देवस्थान वायरी भूतनाथ येथे भाई मांजरेकर यांच्या निवासस्थानी गुरुवार दि ८ फ्रेबुवारीला संध्याकाळी ४ वा. येणार आहे. तर शुक्रवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता देव रवळनाथ पालखी तरंगासहीत समुद्र स्नानाला रवाना होणार आहे.

शुक्रवार दि. ९ फ्रेब्रुवारी रोजी महोदय पर्व (मोदया) आहे. त्यानिमित्त श्री देव रवळनाथ पंचायतन निरूखे कुडाळ हे देवस्थान वायरी भुतनाथ सर्व भाई मांजरेकर यांच्या निवासस्थानी येणार आहे. शुक्रवारी ९ फेब्रुवारीला देव रवळनाथ पालखी तरंगासहीत समुद्रस्नानाला जाईल. नंतर पूर्ण दिवस रात्र दर्शन चालू राहील. शनिवार १० फेब्रुवारीला देवस्थान  निरूखेकडे प्रस्थान करेल. या देवस्थाना सोबत पूर्ण निरूखे गाव असणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन मांजरेकर कुंटूबियाकडून करण्यात येत आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!