कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर १३ फेब्रुवारीपासून माघी गणेश जयंती उत्सव
सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन ; उत्सवाचे यंदा १४ वे वर्ष
मालवण : मालवण वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून १३ फेब्रुवारीपासून कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगण (शासकीय तंत्रनिकेतन नजीक) येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. धार्मिक विधी, सायंकाळी ४ वा. गणेशमूर्ती आगमन सोहळा, १३ रोजी सकाळी १० वा. गणेश मूर्तीचे पूजन, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत भजन, ७ वा. महाआरती, रात्री ९ वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘उद्धार झाला वारुळाचा’ अर्थात ‘नागपंचमी’ सादर होणार आहे. १४ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत भजन, ७ वा. महाआरती, रात्री ९ वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ, कुडाळचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘भेद शिवपिंडीचा जन्म कालरात्रीचा’ अर्थात ‘मृत्यू रुद्राणी’ सादर होणार आहे.
१५ रोजी सकाळी ९.०० वा. महाआरती, १० वा. रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत भजन, ७ वा. महाआरती, रात्री ९ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवणचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘ब्रस्मपदार्थ’ अर्थात ‘महिमा जगन्नाथ पुरीचा’ सादर होणार आहे. १६ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, दुपारी १२.३० वा., प्रसाद, सायंकाळी ५ हळदीकुंकू समारंभ, ६.३० वा. संगीत भजन, ७ वा. महाआरती, रात्री ९. वा. दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘पुनः भक्षिती मांस आईचे-निर्माण वृश्चिक राशीचे’ सादर होणार आहे.
१७ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत भजन, ७. वा. महाआरती, रात्री ९ वा. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. मोठ्या गटातील तीन विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार, तर लहान गटातील तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. संपर्कासाठी मंदार लुडबे (८५३०७२१८००), अक्षय नरे यांच्याशी संपर्क साधावा. १८ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, १० वा. सत्यनारायण पूजा व तिर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. महाआरती, रात्री ९ वा. भजनबारी सामना श्री देवी भजन मंडळ, देवगडचे बुवा संदीप लोके (पखवाज- योगेश सामंत) व हनुमान भजन मंडळ, कुडाळचे बुवा गुंडू सावंत (पखवाज-विराज बावकर) यांच्यात हा सामना होणार आहे. १९ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय लुडबे यांनी केले आहे.