एमआयटीएम इंजीनियरिंग कॉलेजमध्ये ३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन !

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना संधी ; विजेत्याना आकर्षक बक्षिसे ; जास्तीत जास्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाड येथे ३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील विविध वैज्ञानिक संकल्पनांना वाव मिळावा, या उद्देशाने एमआयटीएम कॉलेजच्या वतीने जिल्ह्यातील व जिल्हयाबाहेरील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रशालेंच्या संघातील विद्यार्थ्यांजवळ शाळेचे किंवा कॉलेजचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यातील प्रथम विजेत्या तीन संघाना अनुक्रमे ५००० रुपये, ३००० रुपये, २००० रुपये, चषक आणि प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ तीन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशालांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी २५ जानेवारी पर्यंत करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी मयुरी दीवान ९२८४६३९३३४ किंवा अनिकेत देसाई ८०८०५६३८९९ यांच्याशी संपर्क साधावा. या विज्ञान प्रदर्शनात जास्तीत जास्त प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घ्यावा असे आवाहन एमआयटीएम इंजीनियरिंग डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही.ढणाल आणि डिप्लोमा प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!