चिंदर रामेश्वर मंदिरात आज विविध कार्यक्रम 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या संकल्पनेतून एकेरी व समूह नृत्य स्पर्धा

मालवण : अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा ऐतिहासिक उदघाटन सोहळा सोमवारी २२ जानेवारीला साजरा होतोय. याचे औचित्य साधून चिंदर येथील श्री रामेश्वर मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या संकल्पनेतून रात्री ८ वाजता प्रभू श्रीरामांच्या गाण्यांवर आधारित एकेरी व समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राम मंदिर उदघाटन सोहळ्यानिमित्त उद्या सोमवारी सकाळी ८ वा. श्री देव रामेश्वर अभिषेक, सकाळी ९ वा. श्री राम महापूजा व अभिषेक, सकाळी १० ते १२ वा. होम हवन व रामनाम जप, सकाळी १२ वा. नैवेद्य व अयोध्येतील श्रीराम मंदिर उ‌द्घाटन सोहळा थेट प्रक्षेपण, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. गावातील विविध भजन मंडळाची भजने, सायं. ६ वा. हळदीकुंकू समारंभ होणार आहे.

प्रथमच श्रीराम यांच्या गाण्यावर भव्य नृत्य स्पर्धा

चिंदर येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच श्रीराम यांच्यावर आधारित गाण्यावर भव्य खुली एकेरी व समूहनृत्य स्पर्धा सायंकाळी ८ वाजता होणार आहे. एकेरी नृत्य स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना ५०००/- ३०००/- , २०००/- रुपये व चषक तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना १,००० /- रुपये व चषक दिला जाणार आहे. तर समूहनृत्य स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाना १०,०००/- , ७०००/-, ५०००/- रुपये व चषक तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना २०००/- व चषक दिला जाणार आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिपक सुर्वे ८४०८०९०१५१, संतोष गांवकर ९४२०७२१८१९, सौ. स्वरा पालकर ९४०४१९४७४० किंवा बाबू कदम ९४२१०३७७१२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चिंदर ग्रामस्थ, बारापाच मानकरी व रामभक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!