कसाल – हेदुळ – खोटले – वायंगवडे – गोळवण रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी मंजूर
भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मंजुरी
मालवण | कुणाल मांजरेकर
गेली अनेक वर्षे खड्डेमय अवस्थेत असलेला कसाल – हेदुळ – खोटले – वायंगवडे – गोळवण मार्ग ईजिमा ४० या रस्त्याच्या दुरुस्ती करीता भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर केला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. भाजपा नेते निलेश राणे हेदुळ माऊली मंदिर येथे जत्रोत्सवाच्या निमित्ताने येथे आले असताना भाजपा बूथ अध्यक्ष रमेश पुजारे, बाबू पूजारे, हेदुळ सरपंच सौ. प्रतीक्षा पांचाळ यांनी याकडे निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार निलेश राणे यांनी हेदुळ गावसहितच हेदुळ व वायंगवडे गावांना जोडणाऱ्या या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे याची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्यात जिल्हा वार्षिक योजना तर उर्वरित रस्त्यासाठी राज्य अर्थसंकल्प अंतर्गत निधी मिळणार असून हा रस्ता आता खड्डेमुक्त होणार आहे.