चिवला बीच येथे शुक्रवारी बीच व्हॉलीबॉल स्पर्धा

मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह. संस्था मर्या. मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन 

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता मालवण नगरपरिषद, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सह संस्था मर्या मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १५ डिसेंबर रोजी सेवांगण समोरील चिवला बिच येथे दुपारी ४ वाजल्यापासून बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

चिवला बीच येथे १६ व १७ डिसेंबर रोजी होत असलेल्या जलतरण स्पर्धेनिमित्त पहिल्यांदा बीच व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अमित हर्डीकर ८५५४०१७१८४ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!