आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड मधील फरक काय ?
सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाकडून मालवणात जनजागृती फलक ; उपक्रमाचे होतेय कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्र शासनाकडून नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड तयार करण्यात येत आहेत. मात्र ह्या दोन कार्डातील फरक नक्की काय ? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून हा संभ्रम दूर करण्यासाठी येथील सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. यातून दोन्ही कार्ड मधील फरक आणि त्याचे महत्व विषद करण्यात आले असून शहरातील विविध भागात हे फलक लावण्यात आले आहेत. सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने सामाजिक भावनेतून हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान कार्ड काढले जात आहे. आयुष्मान भारत कार्ड हे लाभार्थ्यांना कॅशलेस हेल्थकेअर सपोर्ट आहे. आयुष्मान भारत कार्ड हे केवळ वंचितांसाठी आहे आणि SECC द्वारे ओळखले जाते. आयुष्मान कार्ड मोफत गंभीर आरोग्य सेवा प्रदान करतात. आयुष्मान कार्ड प्रति कुटुंब वार्षिक ₹५ लाखांपर्यंत कव्हर करते. आयुष्मान कार्ड हे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड अनिवार्य आहे.
तर आभा हेल्थ आयडी हा आरोग्य नोंदी डिजिटल पद्धतीने ऍक्सेस करण्याचा आणि शेअर करण्याचा एक मार्ग आहे. डिजिटल आभा हेल्थ आयडी सर्वांसाठी उपलब्ध आहे. आभा कार्ड ही एक अद्वितीय आरोग्य सेवा ओळख आहे जी तुमचा वैद्यकीय रेकॉर्ड संग्रहित करते. आभा कार्ड हे वैद्यकीय अहवालांचे अमर्यादित डिजिटल स्टोरेज आहे. आभा कार्ड भारतातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असून हे कार्ड ऐच्छिक आहे.
भाजपच्या मोदी @9 अभियाना अंतर्गत सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने ही महत्वाची बाब फरकासह विषद करून याचे फलक मालवणात ठिकठिकाणी लावले आहेत. ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, ही दोन्ही कार्ड नागरिकांसाठी आवश्यक असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. याबाबत अधिक माहितीसाठी 7588564887 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांनी केले आहे.