मालवणात “मनसे गरबा”ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

गरबा नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ मध्ये शेकडो मालवणवासिय सहभागी

मालवण | कुणाल मांजरेकर : विजयादशमीचे औचित्य साधून मालवणच्या बंदर जेटीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मनसे गरबा” ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने गरबा नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ असे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शेकडो मालवणवासिय सहभागी झाले होते. यावेळी बेंजोच्या तालावर मालवणमधील तरुणाई थिरकली. यानिमित्ताने मालवणमध्ये मनसेमय वातावरण पाहायला मिळाले.

मनसेच्या वतीने विजयादशमीचे औचित्य साधून मालवण बंदर जेटीवर सलग दुसऱ्या वर्षी “मनसे गरबा २०२३” चे आयोजन करण्यात आले होते. याला मालवण वासीयांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दसऱ्या दिवशी नागरीकांनी विविध बक्षिसांची लयलूट केली. या कार्यक्रमाला तरुणांची लक्षवेधी गर्दी होती. त्याचबरोबर महिलांची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले.

कार्यक्रमा दरम्यान गरबा नृत्य स्पर्धा, लकी ड्रॉ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा यांचे देखील आयोजन केले होते. यातील विजेते पुढीलप्रमाणे – गरबा नृत्य स्पर्धा – (पुरुष) प्रथम क्रमांक – नेक्सन परेरा, द्वितीय क्रमांक – गणेश पेडणेकर, तृतीय क्रमांक – निनाद मोंडकर (महिला) प्रथम क्रमांक – सिद्धी माणगांवकर, द्वितीय क्रमांक – करीना खराडे, तृतीय क्रमांक – रिया जांमसंडेकर (जेष्ठ नागरिक) सुधीर लोके, बालकलाकार – चित्रावली जोशी, स्पेशल चाईल्ड – प्रथम क्रमांक- कु रेखा जोशी (कालीमाता), २)द्वितीय क्रमांक- प्रियांका लाड – (महिषासूर ), तृतीय क्रमांक – भूषण आडारकर (मोठा कांतारा), उत्तेजनार्थ – साहिल तोडणकर (छोटा कांतारा), उत्तेजनार्थ – साक्षी मोर्चे (बानुबया).

यावेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. या लकी ड्रॉ मध्ये फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, कुलर, फॅन यांसह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लकी ड्रॉ ची पारितोषिके देखील यावेळी वितरित करण्यात आली.

यावेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर, युवा उद्योजक महाराष्ट्र सैनिक प्रीतम गावडे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड, मनसे तारकर्ली उपसरपंच बजरंग कुबल, माजी तालुका सचिव विल्सन गिरकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, रामनाथ पराडकर, मनविसे उपतालुकाध्यक्ष जनार्दन आजगावंकर, वैभव आजगावंकर, लौकिक अंधारी, कुणाल माळवदे, हर्षद परब, भाग्यश्री लाकडे, प्राजक्ता आढाव, दर्शन सावजी, मिलिंद तेली यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध मालवणी समालोचनकार बादल चौधरी यांनी आपल्या खुमासदार शैलीत समलोचन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!