निलेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है ….
भाजपा नेते निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे जंगी स्वागत ; हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित
बांदा | कुणाल मांजरेकर
भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. ” निलेश राणे आगे बढो… हम तुम्हारे साथ है !” “हमारा नेता जैसा हो, निलेश राणे जैसा हो” अशा गगनभेदी घोषणा यावेळी करण्यात आल्या.
भाजपा नेते निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून त्यांचा निर्णय मागे घेण्याची आग्रही मागणी करण्यात येत होती. निलेश राणे यांच्या समर्थनार्थ अनेक पदाधिकारी, लोकाप्रतिनिधिनी राजीनामे देऊ केले होते. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निलेश राणे यांची भेट घडवून आणल्यानंतर श्री. राणे यांनी आपला निर्णय मागे घेतल्याची माहिती ना. चव्हाण यांनी दिली होती.
या घडामोडीनंतर निलेश राणे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, संजू परब, विजय केनवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, आनंद शिरवलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, धोंडू चिंदारकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, राजन म्हापसेकर, विनायक राणे, राकेश सावंत, अभि गावडे, प्राजक्ता बांदेकर, विलास कुडाळकर, अजिंक्य पाताडे, राजन गावकर, सुशांत घाडीगावकर, ललित चव्हाण, पंकज सादये तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले.