… तर मालवण मधील भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारीही राजीनामे देणार !
तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, शहरअध्यक्ष ललित चव्हाण यांनी मांडली भूमिका
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा नेते निलेश राणे हे आमचे राजकीय आयडॉल आहेत. त्यांच्याच कार्याने प्रभावित होऊन आमच्या सारखे अनेक युवक आज राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती घेणे आमच्या सारख्या नवतरुणांसाठी क्लेश दायक आहे. आजवर निलेश राणे यांचा शब्द आमच्या साठी प्रमाण होता. मात्र आज निलेश राणे यांनी घेतलेला निर्णय आम्हा युवकांना मान्य नाही. त्यामुळे निलेश राणे यांनी हा निर्णय मागे घेऊन आम्हा युवकांना पूर्वीप्रमाणेच मार्गदर्शन करावे, निलेशजी राणे जर आपल्या निर्णयावर ठाम राहात असतील तर आम्हा भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना देखील राजकारणात रस नाही. आम्ही भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी देखील राजीनामे देत असल्याची भूमिका युवा मोर्चाचे मालवण तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर आणि शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी मांडली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, निलेश राणे यांच्या नेतृत्वाने युवा वर्ग प्रभावित होऊन राजकारणात आले आहेत. मालवण तालूक्यात तर आमच्यासाठी निलेश राणे हे आयडॉल असून त्यांच्याविना राजकारण आम्हाला अशक्य आहे. आजवर निलेश राणे यांनी यांनी दिलेले सर्व आदेश आम्ही पाळले. त्यांनी घेतलेले सर्व निर्णय मान्य केले. पण आज त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, नाहीतर आम्ही देखील आपापल्या पदाचे राजीनामे देऊन सक्रिय राजकारणातून बाजूला होत असल्याचे मंदार लुडबे, सुशांत घाडीगांवकर, ललित चव्हाण यांनी म्हटले आहे.