निलेश राणेंनी निर्णय मागे घ्यावा ; भाजपा नेते दत्ता सामंत यांचे आवाहन

२०२४ मध्ये निलेश राणेच कुडाळ मालवणचे आमदार असतील

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर वरून राजकीय निवृत्तीची घोषणा करून कोकणच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या निर्णयाला विरोध होऊ लागला असून भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनीही निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. २०२४ मध्ये कुडाळ, मालवण मतदार संघातून निलेश राणे हेच आमदार असतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपा नेते निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे ट्विट केले आहे. यानंतर दत्ता सामंत यांनी आपली भूमिका मांडली आहे. निलेश राणे यांनी हा निर्णय मागे घ्यावा. २०२४ मध्ये कुडाळ मालवण मधुन निलेश राणे हेच आमदार असतील आणि निलेश राणे यांना निवडणून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगून निलेश राणे आपला निर्णय नक्की मागे घेतील आम्हाला विश्वास आहे आणि तो त्यांनी घ्यावा, हा माझा आग्रह राहणार आहे, असे दत्ता सामंत यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!