मालवणच्या बंदर जेटीवर आज मनसेच्या खुल्या गरबाचा होणार जल्लोष ; बक्षीसांची मांदियाळी !

वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ सह विविध स्पर्धांचा समावेश ; सायंकाळी ७.३० ते १२ वा. पर्यंत आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

विजयादशमीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणात आज सायंकाळी भव्य खुल्या गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालवणच्या बंदर जेटीवर सायंकाळी ७.३० ते १२ वा. पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी वेशभूषा स्पर्धा, लकी ड्रॉ सह विविध स्पर्धा होणार असून यानिमित्ताने बक्षीसांची मांदियाळी ठेवण्यात आली आहे.

मनसेच्या वतीने मागील वर्षीपासून मालवणच्या बंदर जेटीवर विजयादशमी निमित्ताने भव्य स्वरूपात खुल्या गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या कार्यक्रमाचे दुसरे वर्ष आहे. त्यानिमित्ताने वेशभूषा स्पर्धा, भव्य लकी ड्रॉ स्पर्धा होणार असून यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मालवणी भाषेचा बुलंद आवाज बादल चौधरी यांच्या खास मालवणी शैलीत या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन होणार आहे. यावेळी शुक्रतारा बेंजो ग्रुप सर्जेकोटच्या तालावर मालवण वासीय थिरकणार असून मालवण वासियांनी या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!