जात पडताळणीमधील अडचणी दूर करण्यासाठी आ. वैभव नाईकांचा पुढाकार !
समाजकल्याण सहआयुक्तांची गुरुवारी ओरोस येथे घेणार भेट
प्रमाणपत्रांबाबत अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
कुणाल मांजरेकर
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होवून हे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे यासाठी आमदार वैभव नाईक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे गुरुवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ वा. पर्यंत आ. वैभव नाईक सिधुदुर्ग समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांच्या कडून जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात आढावा घेणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रा संबंधित काही अडचणी असतील तर वरील वेळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.