“त्या” कारचालकाची जामिनावर मुक्तता
मालवण : कार अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कृष्णा राणे (वय ६०, रा. जानवली कणकवली) याला आचरा पोलिसांनी मालवण न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीच्या वतीने ऍड. हेमेंन्द्र गोवेकर यांनी काम पाहिले.
आचरा हायस्कुल समोर रविवारी रात्री अपघात घडला होता. कृष्णा राणे यांच्या ताब्यातील कार एम एच ०७ ए जी ४०२५ याची तीन पादचाऱ्यांना धडक बसली. यात दीपक पुरुषोत्तम लोणे पोलीस उपनिरीक्षक पालघर सध्या राहणार आचरा वरचीवाडी व जमेंदर प्रसाद राहणार आचरा वरचीवाडी या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कृष्णा राणे यांच्या विरोधात आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला सोमवारी दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असता त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.