युवासेना सचिव वरुण सरदेसाई ११ सप्टेंबर रोजी मालवणात
शासकीय तंत्रनिकेतन येथील ‘कॉलेज कक्ष’चे होणार उद्घाटन ; युवासेना मालवण तालुका समन्वयक तथा शहरप्रमुख मंदार ओरसकर यांची माहिती
मालवण : युवासेना सचिव वरुण सरदेसाई सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात सहा ठिकाणी कॉलेज कक्ष उद्घाटन केली जाणार आहेत. मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथील कॉलेज कक्ष उद्घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी ते युवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती युवासेना मालवण तालुका समन्वयक तथा मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांनी दिली आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, युवासेना विस्तारक अमित पेडणेकर, युवतीसेना विस्तारक रुची राऊत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी मालवण शहर व तालुक्यातील युवासेना पदाधिकारी यांनी मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे सोमवारी सकाळी १२ वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन मंदार ओरसकर यांनी केले आहे.