मनसे आणि मनविसेच्या वतीने मालवणात श्रावणमासानिमित्त महिला डबलबारी

९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मालवण यांच्या वतीने शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे श्रावण मासानिमित्ताने महिलांची डबलबारी आयोजित करण्यात आली आहे. मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव पुरस्कृत मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळ मालवण बुवा अंकिता गावडे (गुरुवर्य विजय (गुंडू) सावंत), पखवाज वादक योगेश सामंत, तबला गजानन देसाई विरुद्ध श्री स्वामी समर्थ नवतरुणी भजन मंडळ लोरे नं. १ बुवा रिया राजेश मेस्त्री ( गुरुवर्य राजेश मनोहर मेस्त्री), पखवाज मिलिंद लाड, तबलासाथ संकेत पवार यांच्यात ही भजनबारी रंगणार आहे. तरी याचा भजन प्रेमीनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!