युवासेना मालवणच्या वतीने उद्या बाळ गोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा…
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ; युवासेना उपशहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर : गोकुळाष्टमी निमित्त युवासेना मालवणच्या वतीने उद्या गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी १४ वर्षांखालील वयोगटात बाळगोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. युवासेना उपशहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
ही स्पर्धा मालवण तालुका मर्यादित ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकाने आपले किमान ३ फोटो 9730099730, 7021981280 या व्हॉट्सअप क्रमांकावर ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवणे बंधनकारक आहे. तसेच स्पर्धकाने आपले नाव व ओळखपत्र पाठवणे बंधनकारक राहील. स्पर्धकाने आपला फोटो एडिट न करता पाठवणे बंधनकारक असेल. स्पर्धेचे बक्षीस वितरण ११ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त बाळ गोपाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.