दीपक पाटकर यांचा समाजसेवेचा वसा कायम ! रेवतळे येथील वीज वाहिन्यांवरील झाडी स्वखर्चाने तोडली…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विनाखंडित वीज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न ; स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण मधील कार्यसम्राट माजी नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या दीपक पाटकर यांचा समाजसेवेचा वसा कायम सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी काळबादेवी मंदिराकडील चिखलमय झालेला रस्ता पालिकेकडे पाठपुरावा करून एका दिवसात दुरुस्त करून घेतल्यानंतर शहरातील रेवतळे येथे वीज वाहिन्यांवर आलेली झाडी झुडपे श्री. पाटकर यांनी स्वखर्चाने तोडून घेतली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विना खंडित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून श्री. पाटकर यांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

भाजपचे माजी नगरसेवक असलेल्या दीपक पाटकर यांची मालवण शहरात कार्यसम्राट लोकप्रतिनिधी म्हणून विशेष ओळख आहे. नगरसेवक पदाच्या कालावधीत केवळ स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी श्री. पाटकर यांनी प्रत्येकवेळी पुढाकार घेतला आहे. दीड पावणेदोन वर्षांपूर्वी सर्व नगरसेवकांचा कालावधी संपून पालिकांवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. असे असले तरीही दीपक पाटकर यांच्याकडून समाजसेवेचा घेतलेला वसा कायम ठेवण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी शहरातील काळबादेवी मंदिर परिसरातील रस्ता चिखलमय बनल्याने येथील नागरिकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. याबाबत नगरपालिकेकडे श्री. पाटकर यांनी पाठपुरावा करून एका दिवसात हा रस्ता दुरुस्त करून घेतला.

शहरातील रेवतळे येथे वीज वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. यामुळे अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर श्री. पाटकर यांनी वीज वितरणवर अवलंबून न राहता स्वतःच्या खिशातून ही झाडी तोडून घेतली आहे. याबाबत येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी स्थानिक रहिवाशी ललित चव्हाण, कॅलिस फर्नांडिस, धनंजय मिठबावकर, जेरी फर्नांडिस, सूरज भगत, सुभाष मिठबावकर, राजा मांजरेकर, निनाद बादेकर, मांजरेकर, विष्णू कोरगावकर, टेलेस डिसोझा, पाटकर आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!