वायरी रेवंडकरवाडीत श्रावणी शनिवार निमित्त उद्यापासून कीर्तन महोत्सव
मालवण : येथील वायरी रेवंडकर वाडीतील हनुमान मंदिरात श्रावणी शनिवार निमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १९ ऑगस्ट पासून या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. प्रत्येक शनिवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
शनिवारी १९ ऑगस्ट रोजी कीर्तनकार ह.भ.प. श्री. महेश धामापूरकर (धामापूर) यांचे कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियम साथ निलेश गवंडी आणि तबला साथ सुधीर गोसावी देणार आहेत. तर शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी कीर्तनकार ह.भ.प. श्री श्री विनोद सातार्डेकर (वायरी भूतनाथ ) यांचे कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियम साथ अक्षय सातार्डेकर, तबला साथ वैभव मांजरेकर आणि टाळ साथ शानू वालावलकर देणार आहेत. २ सप्टेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. श्री. महेश धामापूरकर (धामापूर) यांचे कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियम साथ निलेश गवंडी आणि तबला साथ सुधीर गोसावी देणार आहेत. तर ९ सप्टेंबर रोजी कीर्तनकार ह.भ.प. प्रभुदास आजगावकर यांचे कीर्तन होणार असून त्यांना हार्मोनियम साथ निलेश गवंडी, तबला साथ वैभव मांजरेकर तर पखवाज साथ अक्षय सातार्डेकर देणार आहेत. तरी या कीर्तन महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान जन्मोत्सव मंडळ वायरी रेवंडकरवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.