कसाल- मालवण आणि वायरी- देवबाग- तारकर्ली रस्त्याच्या कामाला मिळणार चालना…
भाजपा नेते निलेश राणे यांचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र ; कामावरील स्थगिती उठवण्याची मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधीचा ओघ सुरू आहे. गेल्याच आठवड्यात भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील बजेटच्या एकूण २ कोटी ७० लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवत विकासनिधी मतदारसंघात आणला होता. त्यानंतर आता कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या व दोन्ही तालुक्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या कसाल-मालवण रस्त्याच्या १ कोटी ८० लाख तर पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या वायरी-तारकर्ली-देवबाग या रस्त्याच्या १ कोटी ९९ लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ केली आहे. या विकासकामांवरील स्थगिती उठल्यास कुडाळ मालवण मतदारसंघात पुन्हा नव्याने ३ कोटी ८० लक्ष एवढा विकासनिधी उपलब्ध होणार आहे.