यंदाच्या गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी निलेश राणेंच्या संकल्पनेतून “भाजपा एक्सप्रेस”

दादर ते कुडाळ मार्गावर सुटणार गाडी : मालवण, कुडाळच्या गणेशभक्तांना चाकरमान्यांना मिळणार लाभ

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपाचे कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघाचे प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त कुडाळ, मालवण मधील गणेश भक्त चाकरमान्यांसाठी दादर ते कुडाळ मार्गावर “भाजपा एक्सप्रेस” ही विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात चाकरमान्यांना गावी येण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने दर वर्षी चाकरमान्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाण्यासाठी, “भाजपा एक्सप्रेस” ही रेल्वेगाडी दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून कुडाळ – मालवण साठी सोडण्यात येणार आहे. इच्छुक कोकणवासीयांनी आपली सीट बुक करण्यासाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत (सोमवार ते शनिवार) ८६५७६७६४०४, ८६५७६७६४०५ या क्रमाकांवर संपर्क साधावा. सदर प्रवास हा पूर्णपणे मोफत असून कोणालाही कुठल्याही प्रकारचा मोबदला देऊ नये तसेच सदर बुकिंग ही अहस्तांतरणीय असून बुकींगसाठी सरकारी ओळखपत्र आवश्यक आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!