किल्ले सिंधुदुर्ग मधील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी द्या…

भाजपा नेते निलेश राणे यांचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे प्रस्ताव

धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर तलाव, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास संदर्भात देखील सकारात्मक चर्चा

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा नेते निलेश राणे यांनी सोमवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी किल्ले सिंधुदुर्ग मधील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी देण्याचा प्रस्ताव निलेश राणे यांनी यावेळी सादर केला. यावेळी धामापूर भगवती मंदिर परिसर, चिंदर तलाव, डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकासा संदर्भात देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली.

माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून काही महिन्यांपूर्वी कुडाळ तालुक्यातील १० प्रमुख धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मंगलप्रभात लोढा यांच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक पर्यटन योजनेतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर आता किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास करणे, चिंदर तलाव सुशोभीकरण करणे, धामापूर श्री देवी भगवती मंदिर परिसर विकास करणे तसेच तलाव सुशोभीकरण करणे, डिगस चोरगेवाडी धरण येथे उद्यान विकसित करणे व पायाभूत सुविधा निर्माण करणे या विकास कामांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांना सादर केला. याबाबत सकारात्मक चर्चा होऊन ना. लोढा यांनी पुढील कार्यवाहीची सूचना दिली. किल्ले सिंधुदुर्ग येथे पायाभूत सुविधा विकास व अन्य सुविधांसाठी निलेश राणे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली असून चिंदर तलाव सुशोभीकरण ६ कोटी तर धामापूर भगवती मंदिर परिसर व तलाव सुशोभिकरणं तसेच डिगस चोरगेवाडी धरण परिसर विकास यासाठी प्रत्येकी ३ कोटी एवढ्या निधीची मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!