इंजिनिअरिंग प्रवेशाचे टेन्शन आता सोडा ; आता मालवण – कुंभारमाठ मध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने जानकी मंगल कार्यालयात सुविधा कार्यान्वित

मालवण | कुणाल मांजरेकर

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कमी दिवस शिल्लक राहिले असून विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे मालवण मधील विद्यार्थी आणि पालकांना इंजिनिअरिंग प्रवेशाची माहिती जाग्यावरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुकळवाड ( ओरोस) येथील मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट यांच्या वतीने कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयाच्या आवारात इंजिनिअरिंग प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्राचार्य सूर्यकांत नवले यांच्या हस्ते फित कापून या केंद्राचा रविवारी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा विश्वस्त विनोद कदम, खजिनदार सौ. वृषाली कदम, जानकी हॉटेलचे प्रोप्रा. विनय गावकर यांच्यासह योगेश वालावलकर, सिद्धेश शिंदे, मयुरी दिवाण, अपर्णा मांजरेकर, काजल सुतार आदी उपस्थित होते.

जयवंती बाबू फाउंडेशनच्या सुकळवाड येथील एमआयटीएम (मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट) या कॉलेजमध्ये अभियांत्रिकी पदवी आणि पदविका अभ्यासक्रम शिकवले जातात. Digital माध्यमातून दर्जेदार शिक्षण, नामांकीत कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, SC / ST / NT / SBC / VJ / DT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% ट्युशन फी सवलत, OBC / EBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५०%, ट्युशन फी मध्ये सवलत, जैन, मुस्लिम, पारशी, शीख, बौध्द विद्यार्थ्यांना रू. ५०,००० पर्यंत सवलत, विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्यांना भेट, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धांचे आयोजन, REX, METROPULSE EXHIBITION Active Training and placement Cell, Centre for Startup, Innovation, ncubation & Entrepreneurship, व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, निसर्गरम्य वातावरण व प्रशस्त इमारतीत प्रयोगशाळा, वर्ग आणि कार्यशाळा, तज्ज्ञ, व्यासंगी, उच्चशिक्षीत तसेच अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज ग्रंथालय, Wi-Fi सह सुसज्ज १० एकर कॅम्पस, उज्वल निकालाची परंपरा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अशी या संस्थेची वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दुर्ष्टीने हे केंद्र लाभदायक ठरणार आहे. तरी या केंद्राचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!