ना. राणे आणि रेल्वे मंत्र्यांच्या बैठकीत कोकण रेल्वेच्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा
गणेशोत्सव रेल्वे तिकिट बुकींग मधील आरोप, मिनी टॉय ट्रेनसह अनेक विषयांचा उहापोह
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोकण रेल्वेच्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यामध्ये गणेशोत्सव तिकीट बुकिंग बाबत आरोपांसंदर्भात व अधिकच्या हॉलिडे स्पेशल ट्रेन संदर्भात योग्य तो मार्ग काढण्याचे रेल्वे मंत्र्यांनी आश्वस्त केले. तसेच वंदे भारत रेल्वे ट्रेनला कणकवली येथे थांबा देणे, तुतारी एक्सप्रेसला सिंधुदुर्गात नांदगाव येथे थांबा देणे या विषयांबरोबरच कोकण पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या मिनी टॉय ट्रेन बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच पडवे येथील रेल्वेचा अंडरपास बांधण्याच्या प्रस्तावास रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली.